Wed, Jan 23, 2019 10:43होमपेज › Ahamadnagar › नगर : उस दर आंदोलकांना अटक करणार?

नगर : उस दर आंदोलकांना अटक करणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राहुरी : पुढारी ऑनलाईन

‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’,अशा घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले होते. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये ऊसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरु केले. साखर कारखाना संचालक, प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास कार्यकर्ते तयार नसल्याने आंदोलकांना अटक होण्याची शक्यता आहे.

कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या गाड्या आंदोलकांनी अडविल्या. यावेळी ‘स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’, ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा,’ अशा घोषणा देत आंदोलनकर्ते आक्रमक झाले. या मार्गावरुन जाणारी सर्व उसाची वाहने अडविण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्याकडेने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत. ३४०० रुपये उसाचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

आंदोलनस्थळी साखर सह संचालक प्रतिनिधि, पोलिस अधिकारी यांच्या समवेत चर्चा झाली. ऊसाला ३४०० दर मिळावा म्हणून आंदोलक ठाम असल्याने बैठकीत तोडगा निघाला नाही. आंदोलकांनी आंदोलन मागे न घेतल्यास त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्याचे समजते.