Sat, May 30, 2020 05:11होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:24AMसाकुर : वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील जांबूत खुर्द येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन बुरके यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक शेतकर्‍यांनी एकत्र येत दूध दर कोसळत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक दगडी पुतळ्यास दुग्धाभिषेक करत व शेतकर्‍यांनी स्वतः दूध अंगावर ओतून संताप व्यक्त करत निषेध केला.

सध्या दुधाचे दर निच्चांकी पातळीवर आले असून शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी एक जून रोजी करण्यात आलेल्या संपादरम्यान 3.5 गुणप्रत असलेल्या दुधास प्रतिलिटर 27 रुपये दर देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र अद्यापि शेतकर्‍यांच्या हातात या दराने पैसे पडत नाहीत. उलट दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा हा जोडधंदा मोडकळीस आला आहे. तरी राज्य सरकारने दूध दर वाढीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. तसेच 9 मेपर्यंत गावागावात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष नितीन बुरके यांनी सांगितले. 

यावेळी संदीप बुरके, किशोर दुशिंगे, राजू पवार, संजय दुशिंगे, राजू पारधी, माऊली पारधी, अस्लम पठाण, रंगनाथ पारधी, समीर पठाण, हुसेन पठाण, बशीर पठाण, जाकीर हवलदार, वसीम पठाण समर्थ बुरके आदी शेतकरी उपस्थित होते.