Tue, Apr 23, 2019 21:36



होमपेज › Ahamadnagar › नेवाशात सर्वपक्षीयांकडून छिंदम याचा निषेध

नेवाशात सर्वपक्षीयांकडून छिंदम याचा निषेध

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:09PM



नेवासा : प्रतिनिधी

भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. याबद्दल अनेक संघटनेच्यावतीने याचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

क्रांतिकारी शेतकरी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवप्रहार संघटना, भाजपच्यावतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. खोलेश्वर गणपती चौक येथे छिंदमच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय नेवासा येथे घटनेचा निषेध करून  मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सत्ताधारी भाजप व उपमहापौर छिंदम यांच्यावर जोरदार टीका केली. 

यावेळी  क्रांतिकारी पक्षाचे  नंदकुमार पाटील, महेश मापारी,  काकासाहेब गायके, संदीप बेहेळे, सतीश पिंपळे, लक्ष्मण जगताप, राहुल देहाडराय, विशाल  सुरडे,  शहर  काँग्रेस अध्यक्ष  संजय सुखदान, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, विशाल सिंगारे आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी कांँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशीनाथ नवले, गणेश गव्हाणे,  कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, नवनाथ साळुंके,  शिवप्रहार   जिल्हा उपाध्यक्ष दीपक धनगे, शिवाजी वाकचौरे, तालुकाध्यक्ष किशोर जंगले, यांनी तहसिलदार उमेश पाटील यांना लेखी निवेदन देऊन निषेध नोंदविला. तालुक्यात  पुनतगांव, पानेगांव, गोणेगांव, बेलपिंपळगांव, नेवासाफाटा, इमामपूर आदी ठिकाणी  निषेध करण्यात आला.

भाजपच्यावतीने निषेध

पक्षापेक्षा राष्ट्र आमच्यासाठी कायम अग्रणी असल्याने नगर शहराचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केले त्याचा भाजप व सहकारी मित्र निषेध करतो, अशा आशयाचे निवेदन नेवासा येथे भाजपच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, उपाध्यक्ष सचिन देसरडा, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिनकरराव गर्जे, भायुमोचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड.स्वप्नील सोनवणे, घोडेगावचे उपसरपंच पारस चोरडिया, कैलास पवार, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष इस्माईलभाई जहागीरदार, हारूण जहागीरदार, तालुकाध्यक्ष उत्तमराव साठे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहे.