होमपेज › Ahamadnagar › विसापूर कारागृहातून कैद्याने केले पलायन

विसापूर कारागृहातून कैद्याने केले पलायन

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:57PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात  खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण  (रा.महात्मा गांधी रोड, दिघा बेलापूर रोड, नवी मुंबई) या कैद्याने सोमवारी सकाळी चहा पिण्याच्या बहाण्याने पलायन केले. कारागृहाच्या पूर्वेकडील संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो फरार झाला. कारागृह प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तो फरार झाला होता. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सन 2004 मध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात  न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.  सुरुवातीला तो पुणे येथे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, त्याची चांगली वर्तणूक पाहून त्याला सन 2013 मध्ये विसापूर कारागृहात वर्ग करण्यात आले होते.