Sun, Jul 21, 2019 16:47
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › दोघांना राष्ट्रपती पोलिस पदक

दोघांना राष्ट्रपती पोलिस पदक

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील रहिवासी असलेले पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वाघ यांना 23 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे.  वाघ हे सध्या मुंबईत गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाणे, नागपूर शहर येथे नेमनुकीस असलेले श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी सुनिल महाडिक यांनाही पोलिस पदक मिळाले आहे.

वाघ हे 1995 च्या बँचचे पोलिस अधिकारी आहेत. नाशिक येथील अकादमीत प्रशिक्षण घेत असताना त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून किताब पटकाविला आहे. त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक पदकही मिळालेले आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्यांनी महत्वाची भूनिका बजाविल्याने त्यांचा गौरवही करण्यात आला होता. 

सामान्य शेतकरी कुटुंबातील या अधिकार्‍याने पोलिस सेवेत असताना एल.एल.बी., एल.एल.एम.ची पदवी घेतली. त्यांना विधी अभ्यासक्रमातील गुणवत्तेबद्दल मुंबई विद्यापीठाने सन्मानित केले होते. त्यांना मिळालेल्या किताबामुळे नेवासा तालुक्यातील लोकांनी मोठी जल्लोष केला.

महाडिक हे कृषी पदवीधर असून, 1996 साली ते पोलिस उपनिरिक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आतापर्यंत मुंबई, सांगली, विशेष सुरक्षा पथक, गुन्हे अन्वेषन विभाग आदी विभागात काम केले आहे. त्यांना आतापर्यंत गोपणीय अहवालात अतिउत्कृष्ठ म्हणून शेरे मिळाले आहेत. तसेच सातशे पेक्षा जास्त बक्षिसे मिळाली आहेत. कधी काळी त्यांनी रोजगार हमीवर काम करून शिक्षण पूर्ण केले आहे.