Tue, Mar 19, 2019 09:40होमपेज › Ahamadnagar › मनपा प्रभागरचना कोणत्याही क्षणी!

मनपा प्रभागरचना कोणत्याही क्षणी!

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली आहे. प्रभागरचनेचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून, या पार्श्‍वभूमीवर महापालिका हद्दीचा नकाशा शनिवारी निवडणूक आयोगाला सादर केला आहे.डिसेंबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. किमान सहा महिन्यांपूर्वी प्रभागरचना सुरु करण्याचे आयोगाचे धोरण आहे. दोन दिवसांपूर्वीच आयोगाने मनपाला पत्र पाठवून महापालिका हद्दीचा नकाशा सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. प्रभाग रचनेसाठी 2011 मध्ये झालेली जनगणना ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच्या ब्लॉक नुसारच प्रभाग तयार केले जातील. अद्याप आयोगाकडून कोणतेही निर्देश आलेले नाही.

प्रभाग रचना गोलाकार की वर्तुळाकार?

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत गोलाकार प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांमध्ये झिकझॅक प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी प्रभाग रचना गोलाकार की झिकझॅक होणार, याबाबत राजकीय वर्तुळासह इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत जोपर्यंत आयोगाचे निर्देश येत नाहीत, तो पर्यंत प्राथमिक तयारीही होऊ शकत नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.