Tue, Mar 19, 2019 15:30होमपेज › Ahamadnagar › टँकरद्वारे पाण्यामागे राजकारण

टँकरद्वारे पाण्यामागे राजकारण

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 12 2018 12:40AMनगर : प्रतिनिधी

सारसनगर भागात पाण्याच्या टाक्या उभ्या राहिलेल्या असल्यातरी वर्षानुवर्षे या भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामागे मोठे राजकारण आहेे, असा आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी केला.शहर भाजप वकील आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल रासकर यांनी पुढाकार घेऊन सारसनगरमधील विविध वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी मोफत पाणी टँकरचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ खा. गांधी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन नवनीत सुरपुरिया, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, प्रशांत मुथा, रवींद्र बारस्कर, गोपाल वर्मा, मिलिंद भालसिंग, संतोष घोरपडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. रासकर म्हणाले, सारसनगरचा पाणी प्रश्‍न अत्यंत बिकट आहे. हा प्रश्‍न सोडविण्यापेक्षा राजकारणच अधिक केले जात आहे. वर्षानुवर्षे या भागात टँकरने पाणी पुरवठा होत असून लाखो रुपयांची बिले मनपाने अदा केली आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात टँकर घोटाळा झाला आहे. राजकारण करुन जनतेला वेठीस धरले जात आहे. सारसनगरमधील अनेक वसाहतींना आजही टँकरने पाणी पुरवठा होत आहे, मात्र तोही अनियमित असल्याने मोफत पाणी टँकर सेवेचा उपक्रम हाती घेतला आहे.