जामखेड : प्रतिनिधी
जामखेड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनाली जाधव-साळुंखे यांनी पोलिस वसाहतीतील राहत्या घरी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आरडाओरड झाल्याने तिच्या पतीने व पोलिसांनी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सोनाली यांना नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.येथील पोलिस ठाण्यात दोन वर्षांपासून सोनाली कार्यरत आहेत. शनिवारी रात्री अकरा वाजता त्यांनी स्वत:स पेटवून घेतले. त्या 30 ते 35 टक्के भाजल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. सोनाली यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांनी दोनच दिवसांपूर्वी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर जामखेड येथे ही घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.