होमपेज › Ahamadnagar › पोलिस उपनिरीक्षकावर फसवणुकीचा गुन्हा

पोलिस उपनिरीक्षकावर फसवणुकीचा गुन्हा

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:29AMपाथर्डी ः शहर प्रतिनिधी 

पोलिस उपनिरीक्षकाने फसवणूक करून लग्न केले. जातीवाचक शिवीगाळ करीत खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक पावसे व त्याच्या नातेवाईकांसह मित्रावर गुन्हा नोंदविला आहे. उपनिरीक्षकाच्या पत्नीनेच पोलिसात फिर्याद दिली आहे. चार दिवसांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांना निलंबित करण्यात आले आहे.

पाथर्डी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांच्या पत्नीने पोलिसात सोमवारी रात्री फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक पावसे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार दिवसांपूर्वी निलंबित केले आहे. सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीने पाथर्डी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

पुंडलिक धोंडीराम पावसे,गुंताबाई धोंडीराम पावसे, धोंडीराम पावसे (सर्व रा.करंजगाव ता.निफाड जि.नाशिक, हल्ली रा.पाथर्डी.) व (वैजीनाथ पवार रा. पाथर्डी) यांनी माझा शारीरीक व मानसिक छळ केला. पुंडलिक पावसे याने फसवणूक करुन माझ्याशी लग्न केले. मला लोखंडी रॉडने मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पावसे व वैजीनाथ पवार यांनी माझ्यावर बलात्कार केला. तसेच पावसे व पवार यांनी आपल्या लहान मुलीशी अनैसर्गिक प्रकार केल्याची तक्रार नोंदवली आहे. 

पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे व बालकांचे लैगिंक शोषण प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याच प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आपल्या घरी असताना भारत गायकवाड, मीनाबाई उर्फ बायजाबाई अमृत बिलाडे तसेच पहिल्या प्रकरणातील फिर्यादी व तिचे मामा व त्याचा मुलगा (सर्व रा. सुलखेड जी. धुळे ) हे आपल्या घरी आले.  घराच्या बाहेर असलेल्या आपल्या मुलीचा भारत गायकवाड याने विनयभंग केला. इतर आरोपींनी आपणास  तलवारीने मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यशवंत  राक्षे हे करत आहे. पावसे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा तपास उपअधीक्षक अभिजीत शिवथरे करत आहेत. दरम्यान, याच मुद्यावरून पोलिस अधीक्षक शर्मा यांनी पावसे यांना तीन दिवसांपूर्वी निलंबित केले होते.