Wed, Oct 16, 2019 19:47होमपेज › Ahamadnagar › दांगट कुटुंबियांना पोलिस संरक्षण द्या : गायकवाड

दांगट कुटुंबियांना पोलिस संरक्षण द्या : गायकवाड

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:18AMनगर : प्रतिनिधी

पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या कुटुंबाला तात्काळ पोलिस संरक्षण द्यावे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी विशेष मोहल्ला बैठका घ्याव्यात, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.

गायकवाड यांनी काल (दि.2) अ‍ॅड. दांगट यांच्या प्रकृतीची माहिती घेवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेेतली. त्यानंतर त्यांनी संवाद साधला. दांगट यांच्यावर भ्याड पध्दतीने हल्ला करण्यात आला आहे. आज पुरोगामी विचार संपविण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. जे पुरोगामी चळवळीत काम करतात त्यांच्यावर हल्ले होणे म्हणजे त्या प्रवृत्तीलाच  विरोध करणे असा होत आहे. छिंदमच्या प्रकरणानंतरच हा विषय सुरु झाला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे आज राज्याचे लक्ष नगरकडे लागले आहे. राजकीय परिस्थिती बदलल्यानंतरची प्रत्यंतरे वेगवेगळ्या माध्यमातून दिसत आहेत. नगर येथे झालेल्या या प्रकरणामध्येसुध्दा हिंदुत्ववाद्यांचाच हात असल्याचे प्रत्यक्षदर्शनी लक्षात येते, असा आरोप गायकवाड यांनी केला. दरम्यान, दांगट कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शांताराम कुंजीर, अवधूत पवार, अजय भोसले, राहुल पोकळे, उमाकांत अनभुले आदी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळेंनी घेतली माहिती!

अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी माहिती घेतली. युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी सारंग पंधाडे यांच्या मोबाईलवरुन खा. सुळे यांनी अ‍ॅड. दांगट यांच्या पत्नी नीलम यांच्याशी चर्चा केली. तब्येतीची विचारपूस करुन या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांशी चर्चा करण्याचे व या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन खा.सुळे यांनी दिले.