Fri, Nov 16, 2018 05:02होमपेज › Ahamadnagar › पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या

पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:19PMनगर : प्रतिनिधी

मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे न आणल्याने पती व सासरच्या लोकांकडून होणार्‍या छळास कंटाळून पोलिसाच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री (दि. 11) ही घटना घडली.याप्रकरणी पोलिस कर्मचारी विकास नानाभाऊ सातपुते, सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दीर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियांका प्रकाश सातपुते, सतीश गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातपुते हा तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मयत प्रणालीची आई विजयश्री दगडू उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रणाली उजागरे यांचे 4 वर्षापुर्वी विकास सातपुते याच्याशी लग्न झाले. या दांपत्याला अडीच वर्षाची मुलगी असून, मुलगी झाल्यानंतर नवर्‍यासह सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुला मुलगी झाली असून, ती एका हाताने अपंग आहे. तुझ्या मुलीच्या औषधोपचारासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये’, अशी सातत्याने मागणी करीत होते. माहेरच्या लोकांनी पैसे न दिल्यास प्रणाली व मुलीला सासरची मंडळी त्रास देत असत.

अपंग अणार्‍या मुलीच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी पती विकास सातपुते याने सासरच्या मंडळीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. ‘तुम्ही आजच्या आज पैसे द्या, मला माझे घरचे लोक खूप त्रास देत आहेत, तुम्ही ताबडतोब पैसे घेऊन घरी या’ असे 10 एप्रिल 2018 रोजी प्रणालीने वडील दगडू उजागरे यांना फोनवरुन कळविले होते. त्यानंतर वडील उजागरे यांनी प्रणालीच्या घरी जाऊन घरच्यांना समजावून सांगितले होते. तसेच आज पैसे देतो असेही यावेळी सांगितले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रणालीने छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Tags : Ahmadnagar, Police, employees, wife, suicides