Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Ahamadnagar › पोलिस चौकीची दुरवस्था

पोलिस चौकीची दुरवस्था

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 11:37PM

बुकमार्क करा
 

भंडारदरा : वार्ताहर

भंडारदरा पोलिस दुरक्षेत्राला अवकाळी आली असून दरवाजे, खिडक्या मोडकळीस आल्याने ब्रिटिशकालीन इमारत दुर्लक्षित झाली आहे. येथे निवासी पोलिस कर्मचारी दुरवस्थेमुळे राहण्यास धजावत नाही. भंडारदरा परिसरात पूर्वी लोकसंख्या व पर्यटक कमी असताना देखील येथे निवासी पोलिस कर्मचार्‍यांसह पोलिस दूरक्षेत्रामार्फत परिसरातील खेड्यापाड्यांच्या दृष्टिने मध्यवर्ती ठिकाणाहून कारभार  चालविला जायचा. मात्र, कालांतराने लोकसंख्येसोबत पर्यटकही वाढले व गरजेच्यावेळी पोलिस दूरक्षेत्र बंद पडले. ब्रिटिशकालीन इमारत अनेक वर्षे धूळखात पडल्याने दुरवस्था झाली.

इमारत केवळ नावापुरतीच राहिली. या संदर्भात दिलीप भांगरे यांनी सतत पाठपुरावा करून इमारतीच्या डागडुजीसाठी लोकसहभागातून मदत करण्याचे आश्‍वासन दिले. मिनी मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक पी.वाय. कादरी यांच्यासह  पोलिस उपनिरीक्षक अशोक उजगरे, प्रवीण थोरात, राजेंद्र वाकचौरे यांनी पाहणी केली व डागडुजी झाल्यानंतर तातडीने भंडारदरा सारख्या परिसरातील खेड्यापाड्यांसाठी आवश्यक असणार्‍या मध्यवर्ती ठिकाणी पोलिस दूरक्षेत्र पुन्हा सुरू झाल्यास परिसरातील आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निरसन होईल.  पर्यटकांच्या दृष्टिने देखील सुरक्षित व सुखकर होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वचक निर्माण होईल.  यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिस दूरक्षेत्राची दुरुस्ती करण्यात येईल. दरम्यान, या संदर्भात राजूरचे स.पो.नि.कादरी यांनी लोकसहभागातून मदत झाल्यास  गतवैभव मिळवून देण्याची ग्वाही दिली.