Sun, Apr 21, 2019 00:29होमपेज › Ahamadnagar › नगर : जामीन रद्दसाठी पोलिसच करणार अर्ज

नगर : जामीन रद्दसाठी पोलिसच करणार अर्ज

Published On: May 24 2018 8:41PM | Last Updated: May 24 2018 8:50PMनगर : प्रतिनिधी

जामीनावर बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरविणार्‍या राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे जामीन रद्द करण्यात यावेत, यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज करण्यात येण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून तशा हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती विश्‍वसनीय पोलिस सुत्रांनी दिली. केडगाव दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर होऊन बाहेर आल्यापासून त्यातील काही जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवत आहेत.

त्यातून शहरात पुन्हा तणाव होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. दोन्ही गटांकडून वेगवेगळे अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. शहारीत परिस्थिती पुन्हा बिघडू नये, यासाठी पोलिसांकडून जामीन झालेल्यांचे जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान शहरात शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांची बदनामी केल्यावरून पोलिसांत तक्रार अर्ज दिले आहेत. सुरुवातीला शिवसेनेच्या नगरसेवकाने अर्ज दिल्यानंतर काल (दि.24) राष्ट्रवादीच्याही नगरसेवकाने शिवसेनेच्या नगरसेवकाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे.