Wed, Jan 16, 2019 22:28होमपेज › Ahamadnagar › कत्तलखान्यावर छापा; 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

कत्तलखान्यावर छापा; 50 गायींची सुटका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी 

शहरातील झेंडीगेट परिसरात असणाऱ्या कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने छापा टाकला. यावेळी 50 गोवंशीय जनावरांची सुटका करून 2 हजार किलो गोमांस हस्तगत केले. 2 लाखांचे मांस व 2 लाख 80 हजारांची जनावरे असे एकूण 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाची ही कारवाई केली. गुन्हे अन्वेशन शाखेच्या अधिकाऱ्यांना श्वानाने मार्ग दाखविला. श्वानाच्या मागे जाऊन पोलिसांनी हा धाडसी छापा टाकला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Crime, News, Police, Raid , Nagar, Slaughterhouse, Confiscate,Cow,   


  •