Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Ahamadnagar › 10 ट्रॅक्टर पकडले, 7 बोटी फोडल्या

10 ट्रॅक्टर पकडले, 7 बोटी फोडल्या

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 02 2018 11:55PMकर्जत/श्रीगोंदा : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील सीना नदीपात्रात नागलवाडी येथे बेकायदा वाळू उपसा करणार्‍या 10 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीपात्रात श्रीगोंदा आणि दौंडच्या महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळू उपसणार्‍या 7 बोटी स्फोटाद्वारे फोडण्यात आल्या.

कर्जत तालुक्यातील सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. या मध्ये नागलवाडी नदीपात्र परिसर हे मुख्य केंद्र आहे. या नदीपात्रात लिलाव झाला नाही. तरीही वाळू उपसा होत होता. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सहदेव पालवे, गौतम फुंधे, मनोज लातूरकर, शेखर ढमाले, बाबर, शेख, सरोदे यांच्या पथकाने नदीपात्रात घुसून बेकायदा वाळू उपसा करणारे तब्बल  10 ट्रॅक्टर सापळा रचून पकडले.

हे सर्व ट्रॅक्टर कर्जत येथे आणण्यात आले आहेत. या सर्व ट्रॅक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत. 

श्रीगोंदा व दौंड महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने काल (दि. 2) भीमा नदीपात्रात मौजे आर्वी, अनगरे, कौठा परिसरात कारवाई केली. 

यावेळी अवैध वाळू उपसा करणार्‍या 5 फायबर व 2 सक्शन, अशा सात बोटी नष्ट केल्या. या कारवाईत 28 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. 

सदर कारवाई श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन व दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

या कारवाईत मंडल अधिकारी वाघमारे, घोडके, तलाठी पोटे, भावसार, अजबे, बुरकुल, संजय स्वामी, तलाठी सुनील जाधव, तलाठी दिवेकर यांनी सहभाग घेतला. वाळू तस्करी बंद करण्यासाठी श्रीगोंदा व दौंड महसूल पथक युद्धपातळीवर काम करत असून, सलग तिसर्‍या दिवशी संयुक्त कारवाई करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.