Tue, Apr 23, 2019 00:22होमपेज › Ahamadnagar › ‘पाथर्डी’ प्रकरणी हजारेंकडे तक्रार

‘पाथर्डी’ प्रकरणी हजारेंकडे तक्रार

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:55PM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील मिरी येथील पोकलेन फसवणूक व दरोड्याच्या गुन्ह्या प्रकरणी तपासी अधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या संशयास्पद मुद्देमालाबाबत आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड यांनी ज्येेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लक्ष वेधले आहे. गायब मुद्देमालाबाबत पोलिस निरीक्षक व तपासी अधिकार्‍यांची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी हजारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आव्हाड यांनी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तालुक्यातील मिरी येथे 24 जुलै रोजी पुण्यातील (वाळुंज) येथील गोविंद इंगळे यांना स्वस्तात पोकलेन देतो म्हणून दहा ते पंधरा गुन्हेगार आरोपींनी इंगळे यांच्याजवळचे रोख 12 लाख 14 हजार तर 36 हजार रुपये किंमतीचे 4 महागडे मोबाईल असा ऐवज लुटला होता. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने मिरी शिवारात छापा टाकला होता.

या गुन्ह्यातील एका महिला आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख 3 लाख व एक मोबाईल असा ऐवज जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडे दिला. मात्र,तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केवळ 1 लाख 9 हजार रुपये ताब्यात घेतले असल्याचे दाखवले होते. त्यामुळे उर्वरित रक्कमेबाबत शंका उपस्थित करत आव्हाड यांनी मुख्यमंत्री, गृहसचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करत चौकशी करण्याची मागणी केली होती.

हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून याबाबत अण्णा हजारे मुख्यमंत्री व नगर पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करणार असल्याचे किसन आव्हाड यांनी सांगितले.