Thu, Jun 27, 2019 18:19होमपेज › Ahamadnagar › पिकअप चालकास लुटले, टोळीतील एकास अटक

पिकअप चालकास लुटले, टोळीतील एकास अटक

Published On: Mar 07 2018 1:16AM | Last Updated: Mar 07 2018 1:15AMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर चार जणांच्या टोळीने भर रस्त्यात जीप आडवी लावून पीकअपच्या चालकाला लुटले. दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी घरात घुसून मारहाण करून अडीच तोळ्यांचे सोने चोरून नेले. 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काल (दि. 6) पहाटे नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर पारनेर तालुक्यातील ढोकी फाटा येथे चौघा जणांच्या टोळीने जीप (क्र. एमएच-21 व्ही- 2990) आडवी लावली. तसेच चालक श्रीधर उत्तम थोरात (रा. हल्ली रा. सोनारपाडा, मुरबाड, जि. ठाणे) याला चाकूचा धाक दाखून मारहाण करत त्यांच्याकडील 6 हजार 700 रुपये रोख व सहा हजार रुपयांचा मोबाईल घेऊन पोबारा केला. याचवेळी टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी आरोपींचा पाठलाग गेला. त्यातील एकाला ताब्यात घेतले. मात्र तिघे पळून गेले.  दीपक लक्ष्मण भुसारे (वय 21, रा. गोकुळवाडी, ता. जालना) असे आरोपीचे नाव आहे. 

दुसर्‍या घटनेत खडकवाडी येथे संतोष मारुती ढोकळे (वय 45) यांच्या घरात घुसून तीन अज्ञान चोरट्यांनी मारहाण केली. ही घटना काल पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडले. शैला संतोष ढोकळे यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन व घरातील सामानाची उचकापाचक करत चोरट्यांनी पोबारा केला. मात्र यासंबंधी फिर्याद पारनेर पोलिसांत अद्याप दाखल झाली नाही.
पुढील तपास पो. नि. हनुमंतराव गाढे, उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, स. फौ.अशोक भोसले, पो. ना. संतोष शेळके ,पो. कॉ. निवृत्ती साळवे करत आहेत.