Thu, Aug 22, 2019 12:48होमपेज › Ahamadnagar › पेट्रोल डेपोत आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके 

पेट्रोल डेपोत आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके 

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:17PMवाळकी : वार्ताहर

सकाळी 11ची वेळ, इंडियन  ऑईलच्या  अकोळनेर (ता. नगर) पेट्रोल डेपोतील धोक्याची सूचना देणारा सायरन अचानक वाजायला लागतो, आग  लागली असा आरडा ओरडा सुरू होतो, डेपोतील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षकांची एकच धावपळ उडते, थोड्याच वेळात अग्निशामक दल, पोलिस यंत्रणा, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे  पथकही तेथे दाखल होते. सर्वच यंत्रणा अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविते व संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास सोडते.

काही वेळेसाठी का होईना पण काळजाचा ठोका चुकवायला लावणारे हे चित्तथरारकदृश्य या डेपोमध्ये पहावयास मिळाले. त्यास निमित्त होते इमर्जन्सी फायर ड्रिलचे. अचानक आगीची दुर्घटना घडल्यास डेपोत आग प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी या ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी औद्योगीक सुरक्षा संचलनालयाचे उपसंचालक एस. के. देशमुख, नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर, अकोळनेरच्या सरपंच सविता मेहेत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके, इंडियन ऑईलचे वरिष्ठ डेपो प्रबंधक आर. जी. पानकर, भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ डेपो प्रबंधक आशिष आष्टीकर तसेच डेपोतील इतर अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते. पानकर यांनी यावेळी डेपोची माहिती दिली.

Tags : Ahmadnagar, Petrol Depot Fire Prevention Demonstrations