Mon, Aug 19, 2019 06:55होमपेज › Ahamadnagar › लोकप्रतिनिधींना झेंडा फडकवू देणार नाही

लोकप्रतिनिधींना झेंडा फडकवू देणार नाही

Published On: Aug 13 2018 1:17AM | Last Updated: Aug 12 2018 11:18PMनेवासा : प्रतिनिधी

नेवासा येथे मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाच दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला तीन दिवस होऊनही लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची साधी विचारपूसही केली नसल्याने त्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करू देणार नाही, असा इशारा भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल ताके यांनी दिला आहे.

साखळी उपोषण आंदोलनाचे नेतृत्व भाऊसाहेब वाघ, अनिल ताके, दीपक धनगे, संभाजी माळवदे, युसूफ बागवान, बाळासाहेब कोकणे, पोपट जिरे, संदीप बेहेळे, अल्ताफ पठाण, सुनील धायजे, विनायक नळकांडे, विशाल सुरडे, पंकज जेधे, जयदीप जामदार, अभय गुगळे, प्रकाश सोनटक्के, अक्षय गव्हाणे हे करीत आहेत. यापूर्वी पाच दिवसांच्या ठिय्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजात जागृती करण्याच्या दृष्टीने श्री खोलेश्वर गणेश मंदिर चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनास नागरिक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत असल्याचेही ताके यांनी सांगितले.

या साखळी उपोषणात नेवासा तालुक्यातील सर्व गावांतील नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न रहाणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. या साखळी उपोषणामुळे आता आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनाला अधिक पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या साखळी उपोषणात मांडेमोरगव्हाण येथील सरपंच आदिनाथ बारहाते, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, बाबासाहेब तर्‍हाळ, जगन्नाथ पवार, संजय मारकळी, ज्ञानेश्वर तारडे, घोगरगाव येथील अर्जुन पटारे, पांडुरंग पटारे, शिवाजी पटारे, सुदर्शन घोगरे, कौठा येथील रावसाहेब काळे, मच्छिंद्र डाके, आबासाहेब शेळके, जनार्धन भासार आदींनी भेट दिली. तसेच रविवारचा बाजार असल्याने अनेकांनी येथे भेट दिली व स्वाक्षरी करून पाठिंबा दिला.