Mon, Jun 01, 2020 03:10होमपेज › Ahamadnagar › कर्जबाजारीपणाला कंटाळूून आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळूून आत्महत्या

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:43AM

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील माणिकदौंडी भागातील बोरसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या सोनाळवाडी येथील शेतकरी भीमा आबा सोनाळे(वय 65) यांनी बँकेच्या कर्जाला व वाया गेलेल्या कापसाच्या पिकाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

शेतकरी भीमा आबा सोनाळे यांचे डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज होते. त्यात शेतात पिकवलेल्या कापसाच्या पिकावर बोंडअळी  रोगामुळे बरेचशे पीक वाया गेले होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता.त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे या विवंचनेतून ते निराश झाले होते. याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रात्री विषारी औषध घेतले होते. यावेळी नातेवाईकांनी त्यांना नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.मात्र,उपचार चालू असतांनाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.