Thu, Jun 27, 2019 10:10होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांपेक्षा उंदरांचीच चिंता!

शेतकर्‍यांपेक्षा उंदरांचीच चिंता : धनंजय मुंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर/पाथर्डी शहर : प्रतिनिधी

राज्यात शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यावरूनच गेल्या तीनचार वर्षांत किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, याची आकडेवारी शासनाकडे वारंवार मागितली. ती द्यायला अजूनही मुहूर्त सापडत नाही. मात्र, मंत्रालयाच्या इमारतीत मारलेल्या उंदरांची आकडेवारी थेट विधानभवनात सांगितली जाते. सरकारला शेतकर्‍यांच्या आत्महत्येपेक्षा उंदीर किती मारले, याचीच जास्त चिंता वाटत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार होते. मुंडे यांनी भाषणात सरकारच्या शेतकरी, विद्यार्थी विरोधी धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. मुंडे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आपण पाहत आहोत की, राज्यातील शेतकरी वर्गाच्या अडचणीत सातत्याने भरच पडत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढच होत आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे हेच प्रमाण जाणून घेण्यासाठी आपण शेतकरी आत्महत्यांची माहिती देण्याची विनंती सरकारकडे केली.

मात्र, अनेकदा मागणी करूनही सरकारकडून त्याबाबत काहीच उत्तर आले नाही. राज्यातील शेतकर्‍यांचे जात असलेले हे बळी सरकारच्या चुकीच्या धोरणांचे बळी आहेत. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा असताना, त्यावर विधानसभेत, विधान परिषदेत गांभिर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मात्र, सभागृहात चर्चा कशाची होते तर, मंत्रालयाच्या इमारतीत किती उंदीर मारले? ते कोणी मारले? याची. हे सर्व पाहून सरकार नेमके कुणासाठी चालविले जाते? असा प्रश्‍न उपस्थित होत असल्याचेही मुंडे म्हणाले.
 

 

 

 

tags : Pathardi,news,Farmers, in difficult, conditions,


  •