Fri, Apr 26, 2019 16:06होमपेज › Ahamadnagar › युवा साहित्य संमेलनास प्रारंभ

युवा साहित्य संमेलनास प्रारंभ

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:41PM

बुकमार्क करा
पारनेर ः प्रतिनिधी     

पारनेर येथे विद्यार्थी विकास मंडळ,  सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ, पारनेर महाविद्यालय, तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास काल ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला. या दिंडीचे चौका चौकांत स्वागत करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार नंदकुमार झावरे अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष राहुल झावरे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, विजय वाघमारे, चांद शेख, देविदास आबूज, विनोद गोळे, उदय शेरकर, शरद झावरे, दत्ता झगडे, दादा भालेकर,सुभाष दिवटे, तुषार भाटीया, संतोष खोडदे, हरिश शेळके, वैशाली भालसिंग आदी यावेळी उपस्थित होते. आबूज यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

भारतीय राष्ट्रवादाला बळ देण्याऐवजी आपल्या देशात जातीयवादाला बळ दिले जाऊ लागले असून, त्यातून देशाचे कधहीही भरून न येणारे नुकसान होईल, अशी भीती आवटे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, धर्म अथवा जातीचा आधार न  घेता देश उभा राहू शकतो, हे भारताने सिद्ध केले आहे. पाकिस्तान दुभंगत असताना आपला देश मात्र विकासाकडे घोडदौड करीत आहे. भारताइतके धर्म, पंथ असे प्रारूप जगाच्या पाठीवर कोठेही नसून, विविध  जाती धर्माचे आयकॉनही येथेच पहावयास मिळतात.  माजी आ. झावरे म्हणाले, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुरोगामी विचार नव्या पिढीकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून शहरांची मक्तेदारी पारनेरकारांनी मोडीत काढली असून, तरुणांना शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या जिल्हा मराठा समाज संस्थेमार्फत आजवर हजारो तरुणांनी आजवर विविध क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे.