Sat, Dec 14, 2019 06:08होमपेज › Ahamadnagar › मांडवे पूल पाण्याखाली; पारनेर, संगमनेर वाहतूक बंद 

मांडवे पूल पाण्याखाली; पारनेर, संगमनेर वाहतूक बंद 

Published On: Aug 04 2019 4:44PM | Last Updated: Aug 04 2019 5:47PM
संगमनेर : प्रतिनिधी

मुळा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार  पाऊस सुरू असल्यामुळे सध्या 52 हजार क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा नदीला पूर आला असून साकुरच्या नजीक असणारा  मांडवे पूल पाण्याखाली गेला आहे. त्‍यामुळे पारनेर आणि संगमनेर तालुक्याची वाहतूक बंद करण्यात आल्‍याने या गावांचा संपर्क तुटला आहे. 

अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणाऱ्या हरिशचंद्र गड पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्‍यान शनिवार व आज रविवारी पावसाचा जोर ज्यास्तच असल्यामुळे  52 हजार क्यूसेकने पाणी मुळा नदी पत्रात सोडण्यात येत आहे. यामुळे मूळा नदीला मोठा पूर आला आहे. मुळा नदीला आलेल्‍या पुराचे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकानी आणि तरुणांनी  मोठी गर्दी केली होती.  हळू हळू नदीला पाणी वाढत आहे. कोणत्याही क्षणी हा पुल पाण्याखाली जाऊ शकतो म्हणून  पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबविण्यात आली आहे. पूर आल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये म्हणून  प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.