Sun, May 26, 2019 21:12होमपेज › Ahamadnagar › 89 टक्के गावांमध्ये ऑनलाईन सातबारा

89 टक्के गावांमध्ये ऑनलाईन सातबारा

Published On: Mar 05 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 11:36PMनगर ; प्रतिनिधी

जिल्हाभरातील 89 टक्के महसुली गावांतील सातबारा उतारे आता बिनचूक ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. उर्वरित 180 गावांतील उतारे येत्या 15 मार्चपर्यंत ऑनलाईन केले  जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरु आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये नगर जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  जिल्हाभरात एकून 1 हजार 602 महसूली गावे आहेत. या सर्व गावांत एकूण 12 लाखांपेक्षा अधिक सातबारा उतारे आहेत.

खातेदारांची वेळ आणि  पैशांची बचत व्हावी, सातबारा विना कटकटीने आणि सहजरित्या उपलब्ध व्हावा, यासाठी उतारे संगणकीकृत करुन ऑनलाईन उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक महसुली गावातील सातबारा उतारा संगणकीकृत करण्याचे काम सुरु आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हतील 1 हजार 602 गावांपैकी 1 हजार 422 गावांतील सातबारा ऑनलाईन उपलब्ध झाला आहे.

या कामात राहाता तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. या तालुक्यातील 61 गावांपैकी 60 गावांतील सातबारा उतारे आता ऑनलाईन मिळू लागले आहेत. जामखेड तालुका मात्र अधिकच पिछाडीवर पडला आहे. येत्या चार-पाच दिवसांत राहुरी, पारनेर, संगमनेर, नेवासे या तालुक्यांचे काम शंभर टक्के पूर्ण होणार आहे. सातबारा बिनचूक व्हावा, यासाठी संगणकीकृत केलेल्या सातबारा उतार्‍यांची क्रॉस चेकींग केले जात आहे. ऑनलाईन उपलब्ध होणार्‍या उतार्‍यात तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा  हस्तक्षेप करता येणार नाही.