Mon, Aug 19, 2019 01:28होमपेज › Ahamadnagar › पोलिस निरीक्षकाला फसविणाऱ्याला अटक

पोलिस निरीक्षकाला फसविणाऱ्याला अटक

Published On: Aug 24 2018 1:18PM | Last Updated: Aug 24 2018 1:18PMअहमदनगर : पुढारी ऑनलाईन

पोलीस निरीक्षकाला फसविणाऱ्या नवनाथ इसरवाडे याला स्थानिक गुन्हे शाखेन जेरबंदे केले आहे. तो तब्बल पाच गुन्ह्यांमध्ये फरार होता. आमदार विनायक मेटे यांचा बनावट आवाज काढून त्याने  पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना सहा लाख 20 हजार रुपयांना गंडविले होते. नवनाथ इसरवाडे हा शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.  पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना  इसरवाडे यांच्याबद्दलीच माहिती मिळाली होती. त्यावरून पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, नाणेकर, रवींद्र कर्डिले आदींच्या पथकाने त्याला अटक केले आहे.