Tue, Jul 14, 2020 07:50होमपेज › Ahamadnagar › बँजो गाडीच्या अपघातात १ ठार, ७ जखमी

बँजो गाडीच्या अपघातात १ ठार, ७ जखमी

Published On: Jun 13 2019 1:30AM | Last Updated: Jun 13 2019 1:50AM
जामखेड : प्रतिनिधी 

लग्नाची सुपारी वाजवायला निघालेल्या  बँजो गाडीला जामखेड तालुक्यातील जातेगावफाटा परिसरात अपघात होऊन त्यात एक जण ठार, तर 7 जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. 

किशोर गुलाब गायकवाड (वय 45 रा. तेलंगशी) असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. अपघातात विनोद गुलाब गायकवाड (वय 35), किशोर जावळे, प्रवीण जायभाय, दादा गायकवाड, रवी जावळे, सोमनाथ गायकवाड, वंदना गायकवाड हे सात जण जखमी झाले आहेत.

जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील प्रसिद्ध गायक किशोर जावळे यांच्या के के बँजो ग्रुपची टीम उस्मानाबाद जिल्ह्यातील केजला लग्नाची सुपारी वाजवायला निघाली होती. बँजोची गाडी (एमएच 16 सीसी 0041) तेलंगशी येथून खर्डामार्गे निघाली असता जातेगावफाटा परिसरात गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडी भरधाव वेगात होती, असे समजते. 

जखमींना ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यातील वंदना गायकवाड यांना पुढील  उपचारासाठी नगरला हलविले आहे. मृताचे  शवविच्छेदन करून  मृतदेह  कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. जामखेड  पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली.