Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Ahamadnagar › टँकर-दुचाकी अपघातात एक ठार

टँकर-दुचाकी अपघातात एक ठार

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:48PMकोपरगाव : प्रतिनिधी

नगर-मनमाड महामार्गावरील येवला नाका  टँकर आणि दुचाकीच्या  अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा चुलता गंभीर जखमी झाला. काल (गुरुवारी) सकाळी 10. 15 वाजता ही घटना घडली. 

 आफ्रिन आजमेर पठाण (वय 20, समता नगर, कोपरगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे, तर हुरखा बुढणखा पठाण (40 रा. शारदानगर, कोपरगाव) हे गंभीर जखमी झाला. मृत आफ्रिन ही  डीएडला शिक्षण घेत होती.काल हुरखा आणि  आफ्रिन  हे दोघे दुचाकीवरून (विना क्रमांक) पेपर देण्यासाठी  नगर- मनमाड मार्गाने बाभळेश्वर येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मागून भरधाव आलेल्या टँकरने (क्रमांक एचआर.61 सी. 9277) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात हुरखा आणि आफ्रिन दोघे रस्त्यावर पडले.  टँकर अंगावरून गेल्याने आफ्रिनचा जागीच मृत्यू झाला. हुरखा हे गंभीर जखमी असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अमजद हसन शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टँकर चालक पुष्करसिंग लक्ष्मणसिंग मोहरा ( उत्तराखंड) विरोधात गुन्हा नोंदविला.