Wed, Mar 27, 2019 04:23होमपेज › Ahamadnagar › डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक

डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जामखेडः प्रतिनिधी 

स्वस्तात सोने प्रकरणी एका आरोपीस पकडण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. बेळया टकार्‍या काळे असे या आरोपीचे नाव असून, शुक्रवारी या या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

बेळया टकार्‍या काळे हा सोने प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी असून, जामखेड पोलीसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर करमाळा तालुक्यातील टाकळी येथे बेळयास सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले.दरम्यान, अद्याप तीन आरोपी  केळ्या टकार्‍या काळे, संगिता केळया काळे व महावीर केळया काळे हे फरार आहेत. मंगळवारी (दि.27) स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने महिलेसह तिघांनी दोन आयुर्वेद डॉक्टरांना तालुक्यातील जवळा येथे बोलावून घेत एका डॉक्टरचा खून केल्याची घटना तालुक्यातील जवळा येथे घडली.तसेच मृत व्यक्तीच्या भावालाही जबर मारहाण करण्यात आली होती. यानंतर पोलिस या आरोपीचा तपास करत होते.

फिर्यादी मयताचा भाऊ मनोरंजन जोगेश हालदार  (वय 38, रा नवेलीया पो. पुर्व विष्णूपूर ता.चारधाव. जि. नदिया (पश्चिम बंगाल) हल्ली रा. भंडारवाडी ता. जि उस्मानाबाद) याच्याकडे त्याचा मयत भाऊ श्रीकृष्ण जोगेश हालदार(रा. वर्धा) हा त्या ठिकाणी आला. श्रीकृष्ण हालदार हा वर्धा या ठिकाणी आयुर्वेद दवाखाना चालवतो. 

दि. 25 मार्च रोजी मयत डॉ. श्रीकृष्ण हा उस्मानाबाद जिल्ह्यात भावाकडे आला. त्याला सांगितले की, जामखेड तालुक्यातील काही पारधी समाजाचे कामगार वर्धा येथे कापूस तोडण्यासाठी म्हणून आले होते. त्यावेळी त्यांची ओळख श्रीकृष्ण बरोबर झाली होती. तेव्हा त्या लोकांनी सांगितले की, आम्हाला सोने सापडले असून, तुम्हाला पाहिजे असल्यास स्वस्तात देतो असे सांगितले. या आमिषाला बळी पडून दि. 25 मार्च रोजी हे दोघे सख्खे भाऊ डॉ. श्रीकृष्ण जोगेश हालदार (वय 34) व मनोरंजन जोगेश हालदार (वय 38)  मंगळवारी (दि.27) दुपारी साडेबारा वाजणेच्या सुमारास जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या शिवारातील इंग्लिश स्कूलच्या पुढे पत्र्याच्या शेडमध्ये उतरले. एका बाईने व मुलाने आमच्या बरोबर चला असे म्हणून जवळील शेतात घेऊन गेले.  दोन सोन्याच्या अंगठ्या दाखवल्या.

यानंतर त्या डॉक्टरांनी जवळ आणलेले तीन लाख रुपये दिले. यानंतर त्या बाईने प्लास्टिकच्या बरणीतील अंगठ्या दिल्या. त्या अंगठ्या पाहिल्या असता त्या नकली असल्याचे लक्षात आले. मात्र खोटे सोने हातात पडल्यानंतर आपण फसलो गेल्याचे हालदार बंधूच्या लक्षात आल्यानंतर हालदार व या अनोळखी तिघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत श्रीकृष्ण हालदार (वय  34) यांचा खून करण्यात आला. तर दुसरे  डॉ. मनोरंजन हालदार यांना जबर मारहाण झाली मात्र ते तेथून पळुन गेल्याने वाचले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे अधिक तपास करत आहेत.


  •