Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Ahamadnagar › शासकीय फलकांवर संस्थांची जाहिरातबाजी 

शासकीय फलकांवर संस्थांची जाहिरातबाजी 

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:44PMखेड:  वार्ताहर 

रस्त्यांवर लावण्यात आलेल्या शासकीय फलकांवर सध्या खासगी संस्थांची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यावर कारवाई होत नसल्याने सा.बां.विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

रस्ता सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या या फलकांना सध्या खासगी संस्था आपल्याच स्वमालकीची मालमत्ता असल्याचे समजत आहेत. विना आर्थिक मोबदल्यात चमकोगिरी करणार्‍यांचे पेव वाढले आहे. शासकीय नियमांची पायमल्ली होत असताना हा प्रकार येथील कर्मचार्‍यांना दिसत असून याकडे डोळेझाक केली जात आहे. अशा खासगी संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गावाचे नाव, असलेले अंतर, रस्त्यावर असलेली धोकादायक वळणे आदी सूचना असलेले हे फलक सध्या खासगीकरणाने गजबजलेले आहेत. याबाबत कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा खासगी संस्थावर कारवाई करण्याची गरज आहे. या रस्त्यावरील अनेक फलक गायब आहेत तर काही फलक झुडूपांत झाकून गेले आहेत.

अवैध फलकांवर कारवाई करणार 

जाहिरातबाजी करणार्‍यांना वेळीच लगाम घालण्यात येईल.लावण्यात आलेल्या अवैध फलकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन उपअभियंता ए.बी.भोसले यांनी दिले.