Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Ahamadnagar › पाणीयोजनेसाठी १०० कोटी देऊ

पाणीयोजनेसाठी १०० कोटी देऊ

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 12:27AMजामखेड : प्रतिनिधी

मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जामखेड शहर व वाड्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेसाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.  आगामी तीस वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकार्‍यां दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

जामखेड येथे एका कार्यक्रमास आले असता, पालकमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, नगराध्यक्ष अर्चना राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, सर्व नगरसेवक, जि. प. सदस्य सोमनाथ पाचर्णे, सरपंच बापूराव ढवळे, संजय गोपाळघरे, लहू शिंदे, विठ्ठलराव राऊत, अरुण जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी ना. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. हा निधी लवकरच मिळेल. तसेच शहरातील विविध भागातील जी कामे सुरू आहेत, ती कामे चांगल्या दर्जाची व्हावीत. अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. त्यांनी निवारा बालगृहास भेट दिली. तसेच मदारी समाजाच्या घरकुलाच्या प्रश्‍नासह इतर प्रश्‍न मार्गी लावले जातील व आश्रम शाळांना लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्‍वासन दिले.