Sun, Aug 25, 2019 04:51होमपेज › Ahamadnagar › नगर:शिवजयंतीबद्दल उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य

नगर:शिवजयंतीबद्दल उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य

Published On: Feb 16 2018 11:53AM | Last Updated: Feb 16 2018 5:58PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने युनियनकडेही याबाबत तक्रार केली आहे.

संबंधित बातमी : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

वाचा : सोलापूर : छिंदमवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन (Video)

उपमहापौरांच्या प्रभागातील एका कामासाठी त्यांनी कर्मचार्‍यांची मागणी केली होती. कर्मचारी न पाठविल्यामुळे त्यांनी आज (दि.१६) सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे याला फोन करुन चांगलेच धारेवर धरले. आधीच कर्मचारी कमी असल्याने व शिवजयंती असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे कारण कर्मचार्‍याने दिल्यानंतर उपमहापौरांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल तसेच शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, शिवजयंती तोंडावर आलेली असताना भाजपच्या नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यातच उपमहापौर हे खासदार दिलीप गांधी गटाचे समर्थक असल्याने व मनपात शिवसेना व त्यांच्यात कायमचाच संघर्ष असल्याने भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेलाही आयते कोलित मिळाले आहे.

आणखी बातम्या वाचा 

शिवजयंती सण, उत्सव म्हणून साजरी करणार

लातूर : शिवरायांची रांगोळी अडीच एकरात (व्‍हिडिओ)

धनंजय तू बिनधास्‍त बॅटिंग कर रे : अजित पवार

डीएसकेंचा आधी पासपोर्ट जमा करा : उच्च न्यायालय

डिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद