Sun, May 26, 2019 12:45होमपेज › Ahamadnagar › मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 10:32PMराहुरी : प्रतिनिधी

मराठा समाजाची सध्याची दयनीय स्थिती लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांना इतर मागास प्रवर्गात (ओ. बी.सी.) मध्ये समाविष्ट करण्याची मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज अत्यंत मागासलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. समाजातील जवळपास 80 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात.त्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक शेती, शेतमजुरी व इतर अंगमेहनतीची कामे करून स्वत:चा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या सर्व कारणांमुळे मराठा समाजाची मुलांना शिक्षण देण्याइतपत आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. बहुतांश स्त्रियांना शारीरिक श्रमाची कामे करावी लागतात. समाजाचे राहणीमान व सामाजिक जीवन दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाचे बनले आहे. मराठा समाज माहिती तंत्रज्ञान, संवाद व सरकारच्या इतर योजनांपासून आरक्षणाअभावी वंचित राहत चालला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी  राज्य मागासवर्ग आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना मराठा एकीकरण समिती, अ. भा. छावा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, तसेच अशोक चव्हाण, देवेंद्र लांबे, राजेंद्र खोजे, राजेंद्र सावंत, मच्छिंद्र गुंड, राजेंद्र पवार, सागर सुतार आदी उपस्थित होते.