Sat, Sep 22, 2018 04:47होमपेज › Ahamadnagar › रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर 14 जणांना नोटिसा

रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर 14 जणांना नोटिसा

Published On: Mar 20 2018 2:25AM | Last Updated: Mar 20 2018 2:17AMनगर : प्रतिनिधी

श्रीरामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू राष्ट्र सेनेच्या शहरातील 14 कार्यकर्त्यांना नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. हद्दीपारीबाबत सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासमोर बुधवारी (दि. 21) म्हणणे सादर करण्याचे आदेश त्या नोटीसात देण्यात आले आहेत. नोटीस बजाविलेल्यांमध्ये परशुराम ऊर्फ परेश चंद्रकांत खराडे (वय 31, रा. सातपुते तालिमसमोर, नालेगाव), घनश्याम दत्तात्रय बोडखे (वय 35, रा. जुना बाजार, दाणेडबरा), सचिन नंदकुमार पळशीकर (वय 30, रा. भराडगल्ली, तोफखाना), अभिजित

सुरेश भगत (वय 23, रा. कल्याण रस्ता), सागर मधुकर डांगरे (वय 26, रा. ब्राम्हणगल्ली), सागर सुभाष ठोंबरे (वय 29, रा. ब्राम्हणगल्‍ली), गजेंद्र प्रकाश सैंदर (वय 23, रा. तेलीखुंट), रोहित रमेश सोनेकर (वय 23, झेंडीगेट), महेश रमेश निकम (वय 26, रा. लाटेगल्ली), महेश महारुद्र बागले (वय 26, रा. लोंढेवस्ती), शिवाजी बाबुराव अनभुले (वय 22, रा. कुंभारगल्ली), राहुल अंबादास रोहोकले (वय 25, रा. नालेगाव), ओंकार अशोक घोलप (वय 21, रा. माळीवाडा), सागर लहानू ढुमणे (वय 22, रा. झेंडीगेट) यांचा समावेश आहे.