Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Ahamadnagar › संगमनेरचे उपनगराध्यक्ष अभंग यांचा राजीनामा 

संगमनेरचे उपनगराध्यक्ष अभंग यांचा राजीनामा 

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:50PMसंगमनेर : प्रतिनिधी 

संगमनेरचे उपनगराध्यक्ष नितीन बाजीराव अभंग  यांचा एक वर्षाचा  कालावधी शिल्लक असतानाही त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संगमनेर नगरपलिकेची निवडणूक होऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे. जनतेतून नगराध्यक्ष म्हणून दुर्गाताई तांबे यांची निवड झाली,  तर उपनगराध्यक्षपदी नितीन अभंग यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता, मात्र, त्यांनी इतरांना संधी मिळावी, म्हणून काल शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्याकडे आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्त केला. तो राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे, तेथूनच तो मंजूर केला जाणार आहे.

याबाबत अभंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,   मला माजी मंत्री आ. बाळासाहेब  थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सलग दोनदा संधी दिली. त्यामुळे आपण समाधानी आहोत. माझा कालावधी एक वर्षाचा शिल्लक असताना दुसर्‍यांना संधी मिळावी, म्हणून आपण पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.