Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Ahamadnagar › आगे खूनप्रकरणी फेरसुनावणीचा पर्याय!

आगे खूनप्रकरणी फेरसुनावणीचा पर्याय!

Published On: Dec 07 2017 2:32PM | Last Updated: Dec 07 2017 4:48PM

बुकमार्क करा

 नगर : गणेश शेंडगे

खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणात सरकारने फितूर साक्षीदारांविरुद्ध कारवाई व सत्र न्यायालयातील निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिलाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातून नितीनला न्याय
मिळेल की नाही, हा वेगळा विषय आहे. परंतु, या प्रकरणात परजिल्हा अथवा परराज्यात फेरसुनावणी घेण्याचाही पर्याय आहे. त्यासाठी पीडिताच्या नातेवाईकांनी सन 2002 ला गुजरातमध्ये झालेल्या बेस्ट बेकरी हत्याकांडाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे आवश्यक असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.

नितीन आगे याची आत्महत्या नाही, तर खूनच असल्याच निष्कर्ष न्यायालयाने निकालपत्रात नमूद केल्याचे सरकारी वकील अ‍ॅड. रामदास गवळी यांनी स्पष्ट केलेले आहे. नितीनला शाळेतून ओढत बाहेर काढून शिक्षकांसमोर मारहाण करीत गावात नेले. गावातून धिंड काढून वीटभट्टीजवळ बेदम मारहाण केली. त्यानंतर डोंगरावरील झाडाला गळफास दिला, असे आरोप मयताच्या नातेवाईकांनी फिर्यादीत केलेला आहे. परंतु, फितूर साक्षीदारांमुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. खून झाल्याचे न्यायालय मान्य करते. संपूर्ण गावासमक्ष हा खून होऊनही त्यातून आरोपी निर्दोष सुटल्याने वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपिल दाखल करून फितूर साक्षीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पीडिताच्या नातेवाईकांना सांगितले. अपिलात खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल योग्य की अयोग्य, यावर सुनावणी घेतली जाते. आरोपी सुटण्यामागे साक्षीदार फितूर होणे, हे प्रमुख कारण आहे. अपिलात साक्ष होत नसल्याने त्यातून नितीनला न्याय मिळेल की नाही, हे अनुत्तरीत आहे.

मात्र, नितीनला न्याय देण्यासाठी अन्य काही पर्याय आहेत. गुजरातमध्ये सन 2002 मध्ये झालेल्या बेस्ट बेकरीहत्याकांडाचा संदर्भ यासाठी घेता येऊ शकतो. बेस्ट बेकरी खटल्यातील सर्व आरोपी सन 2003 मध्ये सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले होते. भाजप आमदाराच्या दमदाटीमुळे फिर्यादी जहिरा शेखच फितूर झाली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यात लक्ष घालून खटल्याचा अभ्यास केला व सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील गांभीर्यता व साक्षीदारांवरील दबाव लक्षात घेऊन हा खटला गुजरात राज्याबाहेर चालविण्याचा आदेश दिला. त्यानंतर खटल्याची सुनावणी सन 2004 मध्ये मुंबईतील माझगाव येथील न्यायालयात न्या. अभय ठिपसे यांच्यासमोर झ ा ल ी . त् य ा त फितूर झालेल्या स ा क्ष ी द ा र ा ं च ी पुन्हा साक्ष झाली. साक्षीदारांवर दबाव आणणार्‍यांवरही कारवाई झाली होती. फेरसुनावणी म्हणजे या खटल्याचे सत्र न्यायालयातील कामकाज पुन्हा झाले व दुसर्‍या राज्यातील न्यायालयाने स्वतंत्र निकालपत्र तयार केले. मुंबईच्या न्यायालयाने साक्षी व पुराव्यांच्या आधारे 9 जणांना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयात त्यातील 5 जणांची शिक्षा कायम राहिली.
बेस्ट बेकरीप्रकरणी गुजरातमधील वडोदरा न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्यानंतरही फेरसुनावणीत आरोपींना शिक्षा झाली व उच्च न्यायालयातही ती टिकून राहिली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजून बाकी आहे. नितीन आगे प्रकरणात सीआरपीसी 164 अन्वये न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदवूनही साक्षीदार न्यायालयात फितूर झालेले आहेत. बेस्ट बेकरी हत्याकांडात साक्षीदारासह मूळ फियादीच फितूर झाल्याने आरोपी निर्दोष झाले होते. बेस्ट बेकरी हत्याकांडात 14 जण मयत झाले होते. खर्डा प्रकरणात एकच मयत असला, तरी युवकाला प्रेमप्रकरणाच्या संशयावरून शाळेतून मारहाण करून बाहेर नेले व गावातून धिंड काढून अमानुष मारहाण केली. गळफास देऊन हत्या करण्यात आली आहे. गावातील अनेकांसमोर हत्या होऊन  पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता झाली. खून झाल्याचे निकालपत्रात असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्टही केले आहे. मात्र, आरोपींविरुद्ध पुरावे नव्हते व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाब देऊनही फितूर झाले. त्यामुळे या खटल्यात एकाचाच मृत्यू झालेला असला, तरी घटना अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे साक्षीदारांनी निर्भयपणे साक्ष देण्यासाठी हा खटला इतरत्र पुन्हा चालविता येऊ शकतो. त्यासाठी बेस्ट बेकरी कांडाच्या खटल्याचा आधार घेऊन पीडित मुलाचे नातेवाईक अथवा मानवाधिकार आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अपिल करणे आवश्यक आहे, असे विधिज्ञांचे मत आहे.
न्यायालयाच्या निकालावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे.

क्रमशः .