Tue, Mar 26, 2019 12:04होमपेज › Ahamadnagar › वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा वाहन निरीक्षक

वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा वाहन निरीक्षक

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:35AMनगर : प्रतिनिधी

घरची आर्थिक परिस्थितीची बेताची असतानाही प्रतिकूल परिस्थितीला संधी मानून शुभम तांगडे यांनी एमपीएससी परीक्ष यश संपादन केले आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली आहे. राज्यात 54 वा क्रमांक मिळविला आहे. 

अशोक सीताराम तांगडे (रा.बोल्हेगाव) हे गेल्या 35-40 वर्षांपासून नगर-मनमाड महामार्गावर झोपडी कॅटिन चौकात वृत्तपत्र विकण्याचे काम करत आहेत. शुभमच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना ही कोणत्याही खाजगी शिकवणीशिवाय अभ्यास केला. भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले. दहावीमध्येही विशेष प्राविण्यासह पास होऊन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

उच्च शिक्षण घेत असताना वडील अशोक तांगडे यांना हद‍्यविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर शस्त्रक्रि या करावी लागली. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागला. कौटुंबीक वातावरण तणावाचे असतानाही शुभमने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. अशा परिस्थितीमध्येही मेकॅनिकल इंजिनिरिंगचा डिप्लोमा प्रथम श्रेणीत पूर्ण केला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या विळद घाट येथील आभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्र मास प्रवेश घेतला. बी.ई. मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिवहन विभागासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शुभमने 300 पैकी 206 गुण मिळवून राज्यात 54 क्र मांक मिळविला आहे. 

संधी म्हणून आव्हानांना सामोरे जाः तांगडे

परिस्थिती प्रतिकूल असली तरीही संधी मानून या परिस्थितीला सामोरे जा. वेळ कोणासाठीही थांबत नसते. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ध्येयापासून विचलित न होता यश संपादन करावे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. त्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले पाहिजे, अशी अपेक्षा शुभमने व्यक्‍त केली.