Sun, Jul 21, 2019 16:56
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › नेवासे तहसीलवर मूक मोर्चा

नेवासे तहसीलवर मूक मोर्चा

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 9:49PM

बुकमार्क करा
नेवासा : प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत नेवासा येथे टेंभुर्णी घटनेचा सर्वपक्षीयांच्या वतीने मूकमोर्चाने जाऊन निषेध करण्यात आला. नेवासा येथील संत ज्ञानेश्‍वर मंदिर रस्त्यावरील यल्लम्मा मातेच्या मंदिरापासून मूक मोर्चास प्रारंभ झाला. शांततेत मूक मोर्चा मुख्य रस्त्यावरून तहसील कचेरीकडे आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास गोल्हार, तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, माजी उपसरपंच गोरख घुले, प्रकाश शेटे, माजी शहर प्रमुख अंबादास लष्करे, मनोज पारखे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गफूर बागवान, बजरंग दलाचे संतोष पंडुरे, दिलीप सरोदे यांनी आपल्या भाषणातून तीव्र भावना व्यक्त केल्या.

अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणार्‍या नराधमांना त्वरीत अटक करून, फाशी द्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र  केले जाईल, असा इशारा यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप, युवा सेनेचे शहर प्रमुख, दीपक इरले, गहिनीनाथ लष्करे, राजू लष्करे, ज्ञानेश्‍वर दहातोंडे, अंबादास इरले, संदीप बेहळे, रणजित सोनवणे, भारत डोकडे, नरसू लष्करे, अंबादास धोत्रे, राजेंद्र मापारी, मुन्ना चक्रनारायण, ज्ञानेश्‍वर कुसळकर, दीपक पिटेकर, सायबा जाधव, नामदेव कुसळकर, संदीप धनवटे, मयूर वाघ, अनिल धनवटे, अनिल कुसळकर, सुनील शिंदे, विनायक धनगे, गणेश गायकवाड, ज्ञानेश्‍वर देवकर, कैलास लष्करे, जालिंदर लष्करे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मुन्ना चक्रनारायण यांनी आभार मानले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना निवेदन देण्यात आले.