Fri, Jul 19, 2019 13:31होमपेज › Ahamadnagar › ट्रॅक्टरखाली चिरडून एक ठार

ट्रॅक्टरखाली चिरडून एक ठार

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 10:56PM

बुकमार्क करा

नेवासा : प्रतिनिधी 

नेवाशाहून नेवासा फाट्याकडे डबल ट्रॉॅली ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केली जात असताना अचानक टॅक्टरचे चाक फुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रॅक्टरखाली येऊन जागीच मरण पावला. 
धर्माजी एकनाथ पवार (वय 54, रा.गुजरवाडी ता.श्रीरामपूर) असे मयताचे नाव आहे. प्रदिप बाबासाहेब नवले (वय 25,रा.श्रीरामपूर) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (दि.13) रोजी सकाळी साडेअकरा च्या सुमारास मुळा पाटबंधारे कार्यालयासमोर घडली.

सविस्तर वृत्त असे की, डबल ट्रॉली ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरचे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान ट्रॉलीचे टायर फुटले. त्याचवेळी समोरुन ओलांडणारी दुचाकी (एमएच 17 आर 4373) ट्रॉलीच्यामध्यभागी आली. त्यामुळे झालेल्या भिषण अपघातात धर्माजी एकनाथ पवार जागीच ठार झाले. प्रदिप बाबासाहेब नवले हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नेवासा फाटा ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंंतर त्यास खासगी दवाखाण्यात पाठविण्यात आले.

ट्रॅक्टर व दुचाकीच्या या भीषण अपघाताची माहीती पोलिस निरिक्षक प्रविण लोखंडे यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमीला ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताबाबत मयत धर्माजी पवार यांचा मुलगा योगेश धर्माजी पवार यांनी दिलेल्या खबरीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.