Fri, Sep 21, 2018 07:33



होमपेज › Ahamadnagar › कर्करोगग्रस्त वृद्धेची आत्महत्या

कर्करोगग्रस्त वृद्धेची आत्महत्या

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 10:47PM

बुकमार्क करा





नगर/नेवासा : प्रतिनिधी

कर्करोगाला कंटाळून 75 वर्षीय वृद्ध महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. नेवासे तालुक्यातील माका शिवारातील कोकाटे वस्वतीर काल (दि. 13) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. वैजंताबाई दशरथ कोकाटे (वय 75, रा. कोकाटे वस्ती, माका शिवार, ता. नेवासा) हे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गेल्या 4-5 वर्षांपासून कोकाटे या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्या अंगाला सतत खाज सुटत होती. त्यांचा एक मुलगा रायगड जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरी करतो. दुसरा माका येथे शेती करतो. माका येथील मुलासोबत त्या राहत होत्या. त्या काही दिवसांपासून घराच्या बाहेरील ओट्यावर झोपत होत्या. 

बुधवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुनेला सासू वैजंताबाई या ओट्यावर दिसल्या नाहीत. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घरापासून 100 मीटर अंतरावर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही गोष्ट पतीला व परिसरातील नागरिकांनी सांगितली. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्करोगाच्या आजाराने त्या अनेक दिवसांपासून त्रस्त होत्या. आजारपणाला कंटाळून त्यांची जीवनयात्रा संपविल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.