Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Ahamadnagar › लूटमार केल्याप्रकरणी एकास अटक

लूटमार केल्याप्रकरणी एकास अटक

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:29PM

बुकमार्क करा

नेवासा : प्रतिनिधी 

नेवासा-शेवगाव रस्त्यावर गाडी अडवून मारहाण करून लुटमार करणार्‍यांना जखमी व जखमीच्या नातेवाईकानी दुसर्‍या दिवशी शोधून काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, 13 डिसेंबर रोजी संदीप लक्ष्मण बोरकर (वय 36, धंदा शेती, रा. नेवासा बुद्रुक) हे सकाळी 7.30 वा भानसहिवरा येथे काळे यांच्या शेतात माझे ऊस तोडणीचे हार्वेस्टर चालू असल्याने तेेथे गेले होतो. तेथे उसाचा ट्रक्टर भरून संध्याकाळी भेंडा कारखाना येथे खाली करण्यासाठी गेल्यानंतर ट्रॅक्टर खाली करून रात्री 10.30 वा भेंडा कारखाना येथून नेवासा खुर्द रस्त्याने येत असताना हॉटेल जयराजच्या अलीकडे एक मोटारसायकलवर दोन जण आडवे आले.

त्यांची गाडी थांबविली. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेले 4-5 जण देखील त्यांच्याजवळ आले. त्यापैकी दोघांच्या हातात लाकडी दांडके व दोघांच्या हातात दगडे होती. त्यांनी अडविल्याबरोबर तुझ्याकडचे पैसे काढून दे. नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून त्यांच्या हातातील काठी व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. मोटार सायकलवर असणार्‍या एकाने माझ्या खिशातील रोख रक्कम 3200 रुपये ही काढून घेतले. ते मला मारीत असल्याचे जिवाच्या आकांताने ओरडू लागले. तेव्हा रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या गाड्या थांबल्या. त्यात भेंडा येथील साखर कारखान्यात ऊस खाली करून येणारे ड्रायव्हर प्रवीण शिंदे व त्यांचा जोडीदार गणेश गायकवाड व आणखी काही लोक आमच्याकडे येऊ लागल्याने मारहाण करणारे लोक त्यांची मोटार सायकल जागेवर सोडून पळून जात असताना गाड्यांच्या लाईटच्या उजेडात सदर गाडी पाहिली असता सदर गाडी हिरो कंपनीची पँशन प्रो, काळ्या रंगाची (क्र. एम एच 16 बी के 4435) होती. जखमीला भानसहिवरा येथील डॉक्टर भोईटे यांच्याकडे प्रथमोपचार घेतले.

दरम्यान दि. 14 डिसेंबर रोजी मी सकाळी 10 वा फिर्यादी व त्याचे नातेवाईक बाबा कांगुणे, तान्हाजी गायकवाड, राजू आरगडे असे आम्ही पुन्हा भानसहिवरा येथे जाऊन भानसहिवरा गावातील पोलिस पाटील तुपे यांची मदत घेऊन रात्री अडवून लूट करणार्‍या चोरट्यांनी वापरलेल्या मोटार सायकल (एम एच 16 बी के 443) बाबत विचारपूस केली. त्यांनी सदरची मोटार सायकल ही भानसहिवरा गावातील सचिन बाबासाहेब जावळे यांची असल्याचे समजले. त्यावर सचिन जावळेचा शोध घेतला. तो सायंकाळच्या वेळी मिळून आल्याने त्यास बोरकर यांनी ओळखले व त्यास पकडले असता त्याने रात्री केलेला गुन्हा कबुल केला. त्याच्या साथीदारांबाबत विचारता त्यांची नावे करण वंजारे, गुड्या उर्फ मुन्ना गुलाब देशमुख, सागर वंजारे, अक्षय मकासरे, अतुल वंजारे, असलम युनूस शेख सर्व राहणार भानसहिवरा असल्याचे सांगितले. सचिन बाबासाहेब जावळे याला नेवासा पोलिसांच्या हवाली केले आहे.