Wed, Aug 21, 2019 15:06होमपेज › Ahamadnagar › राज्यात २५०लाख टनाचे गाळप 

राज्यात २५०लाख टनाचे गाळप 

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:37PM

बुकमार्क करा

नेवासा : कैलास शिंदे

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील 176 साखर कारखान्यांनी 14 डिसेंबर 2017 अखेर 254.73  लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 259.38 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. यावर्षी राज्यतील साखर कारखाण्याचे गळीत हंगाम 01 नोव्हेंबर पासून सुरू झालेले आहेत. आजपर्यंत राज्यातील 96 सहकारी व 80 खाजगी अशा एकूण 176 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झालेले आहेत.14 डिसेंबर  अखेर राज्यात  विभाग निहाय झालेले ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा असा : 

कोल्हापूर विभाग : ऊस गाळप 59.71 लाख मे. टन, साखर 65.30 लाख क्विंटल, साखर उतारा 10.94 टक्के. पुणे विभाग : ऊस गाळप 101.31 लाख मे. टन, साखर 100.68 लाख क्विंटल, साखर उतारा 9.94 टक्के. नगर विभाग : ऊस गाळप 36.54 लाख मे. टन, साखर 33.81 लाख क्विंटल, साखर उतारा 9.94 टक्के. औरंगाबाद विभाग:-ऊस गाळप 21.67 लाख मे टन,साखर 17.35 लाख क्विंटल, साखर उतारा 8.01 टक्के. नांदेड विभाग:-ऊस गाळप 33.10 लाख मे टन,साखर 29.24 लाख क्विंटल,साखर उतारा 9.11 टक्के. अमरावती विभाग:- ऊस गाळप 1.95 लाख मे. टन,साखर उत्पादन 1.83 लाख मे. टन,साखर उतारा 9.38 टक्के. नागपूर विभाग:-ऊस गाळप 1.45 लाख मे. टन,साखर उत्पादन 1.17 लाख क्विंटल,साखर उतारा 8.11 टक्के.  

एकूण ऊस गाळप 254.73 लाख मे. टन झाले असून 249.38 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.  साखर उतारा सरासरी 9.79 टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील 144 साखर कारखान्यांनी  165.76 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 167.49 लाख क्विंटल साखर उत्पादित केली होती. साखर उतारा 10.10 टक्के होता. जिल्ह्यातील 21 कारखान्यांकडून 33 लाख मे. टन उसाचे गाळप नगर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांनी 14 डिसेंबर अखेर 33  लाख 90 हजार 452  मे. टन उसाचे गाळप करून  31 लाख 51 हजार 20 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 9.29 टक्के आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले ऊस गाळप, साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा असा :  ज्ञानेश्‍वर : ऊस गाळप 2 लाख 43 हजार 260 मे. टन, साखर उत्पन्न 2 लाख 29 हजार 700 क्विंटल, साखर उतारा 9.44 टक्के.

संजीवनी : ऊस गाळप 1 लाख 76 हजार 799 मे. टन, साखर 1 हजार 59 हजार 375 क्विंटल, साखर उतारा 9.01 टक्के. कोपरगाव : ऊस गाळप 1 लाख 70 हजार 632 मे. टन, साखर 1 लाख 53 हजार 300 क्विंटल, साखर उतारा 8.98 टक्के. अशोक : ऊस गाळप 1 लाख 43 हजार 220 मे. टन, साखर 1 लाख 26 हजार 200 क्विंटल, साखर उतारा 8.81 टक्के. प्रवरा : ऊस गाळप 1 लाख 98 हजार 650 मे. टन, साखर 1 लाख 95 हजार 900 क्विंटल, साखर उतारा 9.86 टक्के. मुळा : ऊस गाळप 2 लाख 2 7 हजार 460 मे. टन, साखर 2 लाख 9 हजार 600 क्विंटल, साखर उतारा 9.21 टक्के. संगमनेर : ऊस गाळप 3 लाख 1 हजार 260 मे. टन, साखर 2 लाख 93 हजार 70 क्विंटल, साखर उतारा 9.73 टक्के. अंबालिका : ऊस गाळप 4 लाख 53 हजार 315 मे. टन, साखर 4 लाख 66 हजार 400 क्विंटल, साखर उतारा 10.29 टक्के. गंगामाई : ऊस गाळप 2 लाख 57 हजार 90 मे.

टन, साखर 2 लाख 17 हजार 640 क्विंटल, साखर उतारा 8.47 टक्के. कुकडी : ऊस गाळप 204350 मे. टन, साखर 1 लाख 99 हजार 600 क्विंटल, साखर उतारा 9.77 टक्के. वृद्धेश्‍वर : ऊस गाळप 1 लाख 17 हजार 790 मे. टन, साखर 1 लाख 1 हजार 600 क्विंटल, साखर उतारा 8.63 टक्के. अगस्ती : ऊस गाळप 1 लाख 42 हजार 687 मे. टन, साखर 1 लाख 3 हजार 600 क्विंटल, साखर उतारा 9.15 टक्के.प्रसाद शुगर : ऊस गाळप 1 लाख 1 हजार 340 मे. टन, साखर 96 हजार 450 क्विंटल, साखर उतारा 8.74 टक्के. नगर तालुका (पियुष) : ऊस गाळप 69 हजार 355 मे. टन, साखर 45 हजार क्विंटल, साखर उतारा 6.49 टक्के. केदारेश्‍वर : ऊस गाळप 47 हजार 220 मे. टन, साखर 30 हजार 670 क्विंटल, साखर उतारा 6.50 टक्के. जय श्रीराम : ऊस गाळप 72 हजार 081  मे. टन, साखर 59 हजार 140 क्विंटल, साखर उतारा 8.20 टक्के. क्रांती शुगर

(पारनेर) : ऊस गाळप 60 हजार 925 मे. टन, साखर उत्पादन 57 हजार 450 क्विंटल, साखर उतारा 9.43 टक्के. श्रीगोंदा : ऊस गाळप 2 लाख 12 हजार 270 मे. टन, साखर उत्पादन 2 लाख 16 हजार क्विंटल,साखर उतारा 10.18 टक्के. गणेश : ऊस गाळप 68 हजार 450 मे. टन, साखर उत्पादन 59 हजार 525 क्विंटल, साखर उतारा 8.70 टक्के. साईकृपा : ऊस गाळप 80 हजार 155 मे. टन, साखर उत्पादन 82300 क्विंटल,साखर उतारा 10.27 टक्के. युटेक शुगर : ऊस गाळप 33 हजार 162 मे. टन, साखर उत्पादन 21 हजार 500 क्विंटल, साखर उतारा 6.48 टक्के. असे एकूण ऊस गाळप 33 लाख 90 हजार 452 मे. टन साखर उत्पादन 31 लाख 51 हजार 20 क्विंटल असून साखर उतारा 9.29 टक्के आहे.