Sun, May 26, 2019 15:41होमपेज › Ahamadnagar › नाऊर-निमगाव खैरी रस्ता दुरुस्तीला सुरूवात

नाऊर-निमगाव खैरी रस्ता दुरुस्तीला सुरूवात

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:15PM

बुकमार्क करा

नाऊर : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर ते निमगाव खैरी रस्त्याची अवस्था  अनेक वर्षापासून खड्डेमय झाली होती. हे खड्डे भरण्यासाठी ‘पुढारी’ने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाने व आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रयत्नाने अखेर या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक ‘पुढारी’ ला धन्यवाद देत आहेत.
नाऊर ते निमगाव खैरी या 11 किमी रस्त्यापैकी 5 ते 6 किलोमीटर रस्त्याची पूर्णतः वाट लागली होती.

याप्रश्‍नी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, न्यायालयीन स्थगिती  असल्याने या रस्त्याप्रश्‍नी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कोणीही पुढाकार घेण्यास तयार नव्हते. ना. विखे यांनी जाफराबाद येथील पाझर तलावाच्या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी आठ दिवसांत हा रस्ता मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर अधिकारी वर्ग धावपळ करताना दिसले होते. मात्र, काही अडचणींमुळे रस्त्याचा प्रश्‍न पुन्हा तसाच पडतो की काय अशी अवस्था झाली होती. यासंदर्भात ‘पुढारी’ ने नाऊर रस्त्याप्रश्‍नी नाऊरकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे-राजकारण्यांकडून केवळ आश्‍वासने या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत या रस्त्यावरील खड्डे संबंधित शेतकर्‍यांच्या पुढाकाराने तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांच्या सहकार्याने भरण्यास सुरूवात झाली आहे. 
परिसरातील नाऊर, जाफराबाद, नायगाव, सराला गोवर्धन, रामपूर आदींसह वैजापूरकडे वाहतूक करणार्‍या नागरिकांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, आ. भाऊसाहेब कांबळे यांना धन्यवाद दिले आहे.