Thu, Feb 21, 2019 13:06होमपेज › Ahamadnagar › राज्याच्या मंत्रिमंडळाचे ‘यमराज दूत’ नामकरण

राज्याच्या मंत्रिमंडळाचे ‘यमराज दूत’ नामकरण

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 13 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण या आत्महत्यांना जबाबदार असल्याचा आरोप करीत पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने राज्याच्या मंत्रीमंडळाचे यमराजदूत मंत्रीमंडळ असल्याची घोषणा करण्यात आली.

शहरातील हुतात्मा स्मारकाजवळ रविवारी (दि.13) आंदोलन करण्यात आले. अ‍ॅड.कारभारी गवळी, सुधीर भद्रे, अशोक ढगे, शाहिर कान्हू सुंबे, अशोक भोसले, नंदा मोरे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अर्चना आढाव, फरिदा शेख, गंगुबाई कोल्हा आदी उपस्थित होते.पूर्वीचे काँग्रेस व सध्याचे भाजप सरकारने शेतकर्‍यांसाठी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. तीन लाखापेक्षा जास्त शेतकर्यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या. महाराष्ट्र शेतकर्‍यांसाठी यमदेवाची भूमी असल्याची प्रचिती या आत्महत्येवरुन आली आहे. या यमराजभूमीला जबाबदार असणारे मंत्रीमंडळ यमराजदूत मंत्रीमंडळ असल्याची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली.