Thu, Nov 22, 2018 02:01होमपेज › Ahamadnagar › केडगाव खून : आमदार जगतापसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ

केडगाव खून : आमदार जगतापसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: Apr 12 2018 5:16PM | Last Updated: Apr 12 2018 5:16PMनगर : प्रतिनिधी 

केडगाव  दुहेरी हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर यांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

या हत्‍याकांड प्रकरणी नव्याने अटक केलेल्या बाबासाहेब कोतकर यालाही चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गोळीबार करणारा आरोपी संदीप गुंजाळ याने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.त्‍याची  वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.