होमपेज › Ahamadnagar › नगर : आगे प्रकरणातील याचिका निकाली

नगर : आगे प्रकरणातील याचिका निकाली

Published On: Dec 20 2017 4:57PM | Last Updated: Dec 20 2017 5:53PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नितीन आगे प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. आगे प्रकरणात सरकारी पक्ष संवेदनशील असून, फेरसुनावणी घेण्याचीही तयारी असल्याचे मत सरकारी वकिलांनी न्यायालयात व्यक्त केले. याचिकाकर्त्याने केलेल्या मागण्या सरकारी पक्षाकडून पूर्ण केल्या जात असल्याने ही याचिका निकाली काढण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. शरद बोर्डे, न्या. खंडेलवाल यांच्यासमोर बुधवारी (दि. 20) भालेराव यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने अँड. अमरजितसिंग गिरासे यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्याच्यावतीने अँड. नितीन सातपुते यांना काम पाहिले. गिरासे म्हणाले की, या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येत आहे. फितूर साक्षीदारांविरूद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया नगरच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात सत्र न्यायालयाने व्यवस्थित पुरावे गोळा केले नसल्याचे निदर्शनास आल्‍यावर  सरकारी पक्षाकडूनच फेरतपासणीची मागणी करण्यात येणार आहे.सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.