Mon, Apr 22, 2019 06:29होमपेज › Ahamadnagar › ‘मूलभूत’पोटी मनपाला भोपळा!

‘मूलभूत’पोटी मनपाला भोपळा!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांसाठी शासनाकडून दिल्या जाणार्‍या निधीपोटी 14 महापालिकांना विकासकामांसाठी 367 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी वाटपात नगर महापालिकेला वगळण्यात आले आहे. वर्षानुवर्षे निधी अखर्चित ठेवल्यामुळेच शासनाकडून मिळणार्‍या अनुदानातून वगळले जाण्याचा फटका महापालिकेला बसला आहे.

शासनाने 26 मार्च रोजी 2017-2018 या आर्थिक वर्षातील मलभूत योजनेच्या अनुदानासाठी 367 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यात 14 महापालिकांचाच समावेश करण्यात आला आहे. नगर महापालिकेला यापूर्वी 20 कोटी व 1.50 कोटींचे अनुदान मिळालेले आहे. मात्र, हा निधी खर्च न झाल्यामुळे 2016-2017 मध्येही मनपाला वगळण्यात आले होते. आता 2017-2018 च्या निधी वाटपातही महापालिकेला वगळण्यात आले आहे.

2013-2014 पर्यंत अदा केलेल्या अनुदानातील अखर्चित निधी 17 मार्चपर्यंत शासनाकडे जमा करण्याचे आदेश बजावले होते. मनपाने मूलभूत अनुदानापोटी 13-14 मध्ये मिळालेला निधी अद्यापही खर्ची पडलेला नाही. विशेष म्हणजे मनपाने अद्यापही अखर्चित निधी जमा करुन त्याचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे यंदाच्या निधी वाटपात महापालिकेला रुपयाचाही निधी शासनाने मंजूर केलेला नाही. शासनाकडून विविध योजनांअंतर्गत होणार्‍या निधी वाटपातही महापालिकेला भरीव निधी मागील काही वर्षात मिळालेला नाही. महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या निधीपोटीचे कोट्यवधी रुपये अखर्चित असल्याने नवीन निधी वाटपात कात्री लावली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.


  •