Fri, Jul 19, 2019 05:43होमपेज › Ahamadnagar › मुलीचा खून करून आईची आत्महत्या

मुलीचा खून करून आईची आत्महत्या

Published On: Mar 23 2018 1:56AM | Last Updated: Mar 22 2018 10:30PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

दोन लहान मुलींना विषारी औषध पाजून आईने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पिसोरेखांड येथे गुरुवारी (दि.22) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पिसोरेखांड येथील विवाहिता श्यामल गणेश यरकळ (वय-28) हिने आराध्या (वय-3 ) आणि एक नऊ महिन्याच्या मुलीस विषारी औषध पाजून स्वतः आत्महत्या केली. आराध्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर नऊ महिन्याच्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पिसोरेखांड येथे यरकळ कुटुंबीय वास्तव्यास आहे. श्यामल हिने सायंकाळच्या दरम्यान दोन्ही मुलींना घरात घेऊन विषारी औषध पाजले. यातील तीन वर्षीय आराध्याला जास्त प्रमाणात औषध पाजले गेल्याने ती जागीच गत प्राण झाली. नऊ महिन्याच्या लहान मुलीला ही विष पाजून स्वत औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दरम्यान, या विवाहितेने मुलींना औषध पाजून स्वतः का आत्महत्या केली, याबाबत कोणताही माहिती उपलब्ध झालेली नाही. कौटुंबीक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सहकारी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली. 

Tags : Mother suicide, killing, her daughter, Shrigonda news