Sun, Aug 25, 2019 04:07होमपेज › Ahamadnagar › विहिरीत पडून मायलेकांचा मृत्यू

विहिरीत पडून मायलेकांचा मृत्यू

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:41AMसंगमनेर : प्रतिनिधी

रस्त्यावरील गतिरोधकावर गाडी आदळल्याने स्कूटी चालविणार्‍या आईसह मुलाचा रस्त्याच्या कडेच्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी  मृत्यू झाला. स्कूटीवर मागे बसलेल्या या महिलेच्या सासूबाई बाजूला फेकल्या गेल्याने सुदैवाने बचावल्या. वीरगाव ते जवळे कडलग दरम्यान ही घटना घडली.प्रियंका महेश देशमुख (22) व सोहम महेश देशमुख (2) असे मयत झालेल्या मायलेकांचे नाव आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवळे कडलग येथील प्रियंका देशमुख या मुलगा सोहम व सासूबाई छाया देशमुख याच्यासह स्कूटी गाडीरून वीरगाव येथे नातकवाईक भारत देशमुख यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पुन्हा वीरगाव ते जवळे कडलग रस्त्याने घरी परतत असताना त्यांची गाडी गतिरोधकावर आदळली. त्यामुळे प्रियंका हिचा तोल गेल्याने गाडी रस्त्याच्या कडेच्या झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या त्यांच्या सासू रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. मात्र, प्रियंका आणि त्यांचा मुलगा सोहम हे दोघे मायलेक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.

रात्री आठ ते नऊच्या सुमारास अकोले येथील दोघा तरुणांनी त्या मायलेकांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया यांनी त्यांना मयत घोषित केले. दोघांचे शवविच्छेदन करून मध्यरात्री या मायलेकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने जवळे गावावर शोककळा पसरली आहे.  याबाबत तालुका पोलिसात ग्रामीण रुगणालयाचे  वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.