Wed, Apr 24, 2019 15:48होमपेज › Ahamadnagar › पैशाच्या व्यवहारातून जीवे मारण्याचा प्रयत्न

पैशाच्या व्यवहारातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: Mar 23 2018 1:56AM | Last Updated: Mar 22 2018 10:41PMनगर : प्रतिनिधी

पैशाच्या व्यवहारातून मुकुंदनगर येथील सलमान आझाद पठाण याच्यावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील हातमपुरा येथे घडली. घटनेवरून पाच जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत सलमान आजाद पठाण (वय 27, रा. मुकुंदनगर) हा जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, सलमान याचा तरबेज शेख याच्याबरोबर पैशाचा व्यवहार होता. परंतु सलमानने वारंवार पैशाची मागणी करूनही ते दिले जात नव्हते. यावेळी सलमान आणि तरबेज यांच्यामध्ये वाद झाला. वादातून तरबेज अन्नु शेख, शहेबाज मलांग शेख, शदाब मलांग शेख व अन्य दोन अनोळखी तरुणांनी त्याला हातमपुरा येथे गाठून तलवारीच्या मागच्या बाजूने मारहाण करून जखमी केले.

tags : ahamadanagar, ahamadanagar newe,  Money transaction, crime, Trying to kill,

यामध्ये सलमान गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी सलमान याचे वडील आझाद नजीर पठाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.