Thu, Jul 18, 2019 04:25होमपेज › Ahamadnagar › वाळू तस्करांकडून महिलेचा विनयभंग

वाळू तस्करांकडून महिलेचा विनयभंग

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:36PMसंगमनेर : प्रतिनिधी

वाळूची वाहतूक करण्यास विरोध करणार्‍या महिलेला संगमनेर खुर्दच्या माजी सरपंचासह तीन वाळूतस्करांनी दमबाजी करत तिचा विनयभंग केला  तर दुसर्‍या घटनेत आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिली? असे म्हणून महिलेला दमबाजी करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. वरील दोन्ही घटनेप्रकरणी सहा जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर खुर्द शिवारातील एक महिला व तिच्या पतीने प्रवरा नदीपात्रातून वाळू वाहतूक करण्यास वाळू तस्करांना विरोध केला होता.  याचा राग अनावर झाल्याने  संगमनेर खुर्दचा माजी सरपंच सवगर्‍या शिंदे, बापजी शिंदे (दोघेही रा. संगमनेर खुर्द) तसेच तनवीर शेख (रा. नाटकी, संगमनेर) या तीन वाळू तस्करांनी त्या महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेला शिवीगाळ करीत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर महिलेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील तिघा वाळू तस्करांच्या विरोधात  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

दुसर्‍या घटनेत आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली ? असे म्हणून अमोल सुपेकर, मनोज राक्षे व संजय राक्षे (रा. संगमनेर खुर्द) या तिघांनी एका महिलेच्या दुकानावर जाऊन  तिच्याशी झटापट करून तिचा विनयभंग केला आणि तिस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दोन्ही महिलांनी शहर पोलिसात दिलेल्या दोन वेगळवेगळ्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.